सावरकर नमन - एका पुस्तकाचे वाचन

28 मे 2024 ला सावरकरांना 141 वर्ष पूर्ण होत आहेत.... त्यांच्या ह्या जन्मदिनाच्या औचित्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझे नमन म्हणून मी किमान त्यांचे एक पुस्तक वाचावे, त्यावरील बहुपर्यायी प्रश्न सोडवावे आणि त्याचे प्रशस्तिपत्रक अभिमानाने मिरवावे असा हा उपक्रम आहे.

सावरकरांसारख्या वैचारिक क्रांतिकारकाला, त्यांच्या जन्मदिनी, त्यांचे विचार जाणून घेण्याचा यत्न करणे यापेक्षा चांगली भेट आपण काय देऊ शकतो?

सावरकरांना नमन करण्यासाठी सावरकर प्रेमींनो आपण -

  • १. खाली दिलेल्या निवडक ११ पुस्तकांपैकी आपल्या रुचीनुरुप एक पुस्तक निवडावे.
  • २. जास्तीत जास्त १५ दिवसात ते पूर्ण करण्याच्या निश्चयाने वाचावे .
  • ३. जसे पूर्ण होईल तसे, स्वतः चे नाव "Register" करून, त्या पुस्तकावरील ३० पर्यायनिष्ठ प्रश्न सोडवावे.
  • ४. उत्तीर्ण सावरकरप्रेमीस लगेचच त्यांच्या नावाचे प्रशस्तिपत्रक मिळेल ते अभिमानाने मिरवावे.
  • ५. आवडीनुसार नंतर पुढील पुस्तक आणि प्रशस्तिपत्रक मिळवावे.
  • ६. असे करत संपूर्ण सावरकर साहित्याचा अभ्यास, प्रचार आणि प्रसार करत जीवन सार्थ करावे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझ्याकडून साहित्य वंदना

१८५७ चे स्वातंत्र्यसमर

१८५७ चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक, १८५७ चा उठाव हे शिपायांचे बंड नसून तो भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा होता, हे सावरकरांना ह्यातून सांगायचे आहे. भारतीयांमध्ये पराभूत मानसिकता आणण्याच्या हेतुपुरःसर प्रयत्नांना सुरुंग लावणारे, पराभूत मानसिकतेचे खंडन करत पुन्हा पुन्हा क्रांतिकार्यासाठी प्रेरित करणारे आणि मार्गदर्शन करणारे असे हे अद्भुत पुस्तक आहे. जगाच्या इतिहासातले हे असे पहिले पुस्तक आहे कि ज्यावर प्रकाशनपूर्व बंदी आणली गेली. क्रांतिकारकांची गीता असलेले हे पुस्तक सर्वानी वाचलेच पाहिजे असे आहे. कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी त्या देशाचा खरा इतिहास तिथल्या प्रत्येक नागरिकाला माहिती असायलाच हवा आणि त्याचा सार्थ अभिमानसुद्धा असावा आणि हेच जागविण्याचा प्रयत्न, या पुस्तकातून वीर सावरकर करतात. १८५७ चे स्वातंत्र्य समर कसे घडले? कोणते मुद्दे परिणामकारक ठरले, कुठे विचारांची कामकुवतता ठरली, कुठे नीती चुकली ह्याचा साधक-बाधक विचार या पुस्तकात दिसून येतो. इतिहासाच्या पाऊलखुणा या भविष्याची वाटचाल ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावे असे पुस्तक.

माझी जन्मठेप

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योद्धे वीर सावरकर यांना दोन जन्मठेपेची म्हणजे पन्नास वर्षांची शिक्षा झाल्यावर त्यांची रवानगी अंदमानला केली गेली. तेथले त्यांचे जीवन म्हणजे मृत्यूशी झुंज होती. मन सुन्न करणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र. काळया पाण्याची शिक्षेतील भयप्रद व सर्व कटू अनुभव वाचताना काळजाचे पाणी होते. ती भोगत असताना त्यांना स्फुरलेले काव्य, ते लक्षात ठेवण्याची त्यांची दांडगी स्मरणशक्ती यामधून त्यांच्या राष्ट्र भक्तीचे दर्शन घडते. हे चरित्र ज्याने वाचले तो कधीही आत्महत्या करायला धजावणार नाही. येणाऱ्या पिढीने हे चरित्र जरूर वाचावे, ज्यामुळे त्यांना पारतंत्र्य काय होते, स्वांतत्र्य मिळविण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्यासाठी ते कसे मिळवले हे समजेल व त्यांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत राहील. मृत्युने सावरकरांना हरविले नसून, त्यांनी मृत्यूचा पराभव करण्याची शिकवण आपणा सर्वांना दिली आहे. हे चरित्र वाचल्यावर असे जाणवते की येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून त्यावर आपण विजय मिळवू शकतो.

मॅझिनी

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या एका महान क्रांतिकारकाला प्रेरणा देणारा, देशभक्ती, क्रांती, स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय याचे धडे देणारा, एक इटालियन देशभक्त, लेखक आणि लोकशाही राष्ट्रवादाचा व मानवी मूलभूत मूल्यांचा प्रवक्ता म्हणजे जोसेफ मॅझिनी. राष्ट्रवादाकरिता जीवनभर लढणारा व एकोणिसाव्या शतकातील यूरोपला क्रांतिकारक प्रेरणा देणारा महान क्रांतिकारक म्हणून यूरोपच्या इतिहासात त्याला अविस्मरणीय स्थान प्राप्त झालेला अश्या क्रांतिकारकाचे हे पुस्तक....आपली स्वातंत्र्य, देशप्रेम, क्रांती याची समज दृढ करण्यासाठी हे पुस्तक वाचलेच पाहिजे...

सहा सोनेरी पाने

सहा सोनेरी पाने हे सावरकरांनी लिहिलेले भारतीय इतिहासावरील पुस्तक आहे. यामध्ये हिंदूंचा इतिहास प्रामुख्याने वर्णिला आहे. भारतावर जी परकीय आक्रमणे झाली, त्यांमध्ये हिंदूंनी कशा प्रकारे प्रतिकार केला यावर यामध्ये प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर, हिंदू धर्मातील जातिभेद, त्याच्याशी निगडित इतर प्रथा यांमुळे हिंदू समाजाचे झालेले नुकसान, व त्यांतून धर्म रक्षणासाठी काढलेले मार्ग हे महत्त्वाचे मुद्देदेखील या पुस्तकात चर्चिले आहेत. सध्या विकृत अशा डाव्या विचारसरणीतून जो हिंदूविरोधी इतिहास शिकवला जातो आहे, त्याचे भेदन करण्याचे एक उत्तम साधन म्हणून या पुस्तकाचा अभ्यास जरूर व्हावा.

विज्ञाननिष्ठ निबंध

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुस्तक "विज्ञाननिष्ठ निबंध" हे विज्ञान, प्रौद्योगिकी, आणि समाजशास्त्रातील त्यांच्या विचारांची मांडणी करणारे आहे. ह्या पुस्तकात सावरकर यांनी भारतीय समाजातील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या महत्त्वाची चर्चा केली आहे. त्यांनी विज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा विकासाची गरज, मार्ग आणि त्याचा व्यक्ती तसेच समाजावर होणार परिणाम याबद्दल विशेष चर्चा केली आहे ज्यामुळे ही पुस्तक विज्ञानपरक विचारांची एक मूळ निर्मिती आहे, म्हणून प्रत्येकाने वाचण्याची गरज आहे.

हिंदुपदपादशाही

भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखीत हिंदूपदपादशाही हे पुस्तक खूपच वरच्या दर्जाचे आहे.या पुस्तकाचे वेगळेपण हे आहे की शिवाजी महाराजांपासून ते इंग्रजांनी पेशवाई बरखास्त करण्यापर्यंत असा सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांचा इतिहास सावरकरांनी खूपच ओघवत्या शैलीत व रंजक पद्धतीने मांडला आहे. काही वेळेस ऐतिहासिक पुस्तके कंटाळवाणी होऊ शकतात पण हे पुस्तक त्याला अपवाद आहे.कुठेही क्लिष्टता न येऊ देता परकीय राजवटींविरुद्ध आपल्या भारतीय राजांनी दिलेला लढा लेखकाने खूपच रंजकपणे मांडला आहे.पुढील पिढीला आपला जाज्वल्य इतिहास समजावा आणि सावरकरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

जात्युच्छेदक निबंध

सावरकर यांची ही कादंबरी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची जीवंत प्रदर्शनी आहे ज्यामुळे ती आजही चर्चेत आहे. त्यांच्या "जात्युच्छेदक निबंध" मध्ये भारतीय समाजातील जातीचे भेदभाव, जातिपरत, जातिवाद, आर्य-द्रविड बंधन आणि इतर संबंधित विषयांची चर्चा केली आहे. सावरकरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून, हिंदू समाजाला, जातीपाती व त्यातून निर्माण होणाऱ्या अस्मिता यातून समाजाचे दुर्बलीकरण या विषयी जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे ही कादंबरी आजही समाजाचे दिशादिग्दर्शन करणारी आहे.

हिंदुत्वाचे पंचप्राण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे हे पुस्तक "हिंदुत्वाचे पंचप्राण" ही हिंदुत्व या विचाराचे एक महत्त्वाची व्याख्या करणारे पुस्तक आहे. ह्या पुस्तकात सावरकर यांनी हिंदू समाजातील पंचप्राण, अर्थात धर्म, जात, भाषा, राष्ट्र आणि संस्कृतीची महत्त्वाची व्याख्या केली आहे. त्यांनी हिंदू समाजातील पंचप्राणांचे महत्व, सांप्रत परिस्थितीत त्यावर होणारे आघात आणि त्याबाबतीत प्रत्येक हिंदूने सजग राहून, एकत्रित होण्याचा मंत्र या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे.

भाषेचे शुध्दीकरण आणि शब्दकोश

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुस्तक "भाषेचे शुध्दीकरण आणि शब्दकोश" हे मराठी भाषेविषयी विचार करणारे एक महत्त्वाची पुस्तक आहे. ह्या पुस्तकात सावरकर यांनी मराठी भाषेच्या विकासाचे महत्त्व, भाषेचे स्वरूप, शब्दकोशाचे महत्त्व, आणि भाषेचे शुध्दीकरण यांच्यावर चर्चा केली आहे. सावरकर यांनी मराठी भाषेच्या विकासाच्या निमित्ताने केलेले उपक्रम आणि प्रकल्प यांचे वर्णन या पुस्तकात केले आहेत. सगळ्या मराठी प्रेमींनी आवर्जून वाचावे असे पुस्तक...

क्ष किरणे

पुस्तकाच्या शिर्षकातच त्या पुस्तकाचा विषय स्पष्ट सांगितला आहे. ज्याप्रमाणे क्षकिरणे आपल्या शरीरात प्रवेश करून कुठे दोष आहे हे दाखवतात. त्याप्रमाणे सावरकरांनी, हिंदू धर्मीय पोथी , रुढी परंपरा यांचा आधार घेऊन आपल्या चुकीच्या वागण्याचे समर्थन करतात असे प्रतिपादन केले आहे. त्यासाठी त्यांनी गो पूजेचे उदाहरण दिले आहे, त्याचबरोबर देवपुजन, पूजा पद्धती, पशूंना देव मानणे कितपत योग्य या सर्व विषयांची चर्चा केली आहे. ज्या वेळेस प्लेगची साथ आली आणि मनुष्य हानी झाली त्यावेळेस गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वावर खरमरीत टिकाही या पुस्तकात केली आहे. जे विचार आज आचरणात आणण्याची गरज आहे त्यांचीच मांडणी / मीमांसा आणि मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.

मोपल्यांचे बंड अर्थात मला काय त्याचे

काय आहे या पुस्तकांत ? महार कम्बूने दिलेली हिंदूचा नाश करण्याच्या मोपल्यांच्या कारस्थानाची माहिती नंबुद्री ब्राम्हणांना खरी वाटली नाही! प्रतिकाराची सिद्धता त्यांनी केली नाही. त्यामुळे त्यांना भयानक अत्याचार कसे भोगावे लागले ते अंगावर शहारे आणणारे वर्णन अधमांचे अत्याचार या प्रकरणांत वाचा ! त्यांचा विचार करा सावध व्हा!! कार्याला लागा!!! मला काय त्याचे ही प्रवृत्ती सोडा. प्रबळ व्हा म्हणजे सुखी व्हाल! समृद्ध व्हाल!!

संकेतस्थळदर्शक

नोंदणीकृत सावरकरप्रेमी

संकेतस्थळावरून पुस्तके घेतली

सावरकरांना साहित्य वंदना

संपर्क साधा

Our Address

1st Floor, Raj Apartment,
Rachna Vidyalay Road,
Sharanpur Rd, opp. to BSNL Office,
Nashik, Maharashtra 422002

Email Us

contact@savarkarpremi.online
swapnil.mashalkar@gmail.com

Call Us

+91 9922942972
+91 9422945125